



1
2
3
परिचय
मौजे चिंचणी गावाविषयी माहिती
सातारा जिल्ह्यातील कण्हेर प्रकल्पामुळे पुनर्वसन झालेले पंढरपुर तालुक्यातील चिंचणी हे स्वतंत्र ग्रामपंचायत असणारे ६५ कुटुंबाचे छोटेसे गाव. विस्थापना नंतर जगण्याची लढाई लढत असताना ते जगणं आनंदी व सुंदर व्हावं म्हणून रडत न बसता गावातील लोकांनी गेल्या वीस वर्षांमध्ये १२ हजाराच्या आसपास झाडे लावून ती जगवली आहेत. गावातील पूर्वीच्या ओसाड माळारानावर वनराई फुलवून प्रति महाबळेश्वर उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामुळे गावांमध्ये नैसर्गिक वातावरण तयार झाले असून गावाला पर्यटनाचा ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आलेला आहे. प्रत्येक कुटुंबातील एक महिला सदस्य असणारी वरदायीनी महिला बहुउद्देशीय सामाजिक सेवा सहकारी संस्था स्थापन केली आहे. या संस्थेचा संपूर्ण बायलॉज हा पर्यटन, पर्यावरण पूरक, विकेंद्रित उद्योग सेंद्रिय शेती आहे. सदर संस्थेची नोंदणी पर्यटन संचनालय (DOT) शासन विभागाकडे करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पर्यटन केंद्र चालवले जाते. महाराष्ट्रातील बहुदा हे एकमेव पर्यटन केंद्र असावे की जे लोकसहभाग लोकवर्गणी व शासनाच्या निधीमधून चालवले जाते. या पर्यटन केंद्रामध्ये सोलापूर जिल्ह्याची ओळख असणारी ज्वारी व थंडीच्या दिवसांमध्ये लोकप्रिय असणारी हुरडा पार्टी मोठ्या प्रमाणात चालते. त्याचबरोबर पुरणपोळी, आंबा रस पोळी, दहि धपाटे, मिरच्याचा ठेचा, शेंगाचटणी, पिठलं भाकरी इ. खाद्यपदार्थ गावरान चुलीवरचे जेवण वर्षभर सुरू असते. सण उत्सव काळामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून पर्यटकांना महाराष्ट्रीयन ग्रामीण संस्कृतीचा आणि खाद्यपदार्थाचा आनंद दिला जातो. पर्यटन केंद्रामध्ये व हॉटेलमध्ये काम करणारे सर्व स्त्री पुरुष हे गावातीलच असून यामुळे गावातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध झाला असून त्यांना गेले तीन वर्षांमध्ये लाखो रुपये मिळालेले आहेत. गेले तीन वर्षांमध्ये २५ हजार पेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली असून यामधून लाखो रुपयांच्या उलाढाल झालेली आहे. सध्या हे पर्यटन केंद्र अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असून पर्यटकांचा प्रतिसाद बघून शासन स्तरावरून वेगवेगळ्या योजनांमधून पर्यटन केंद्राला चालना देण्यासाठी मदत केली जाते आहे. प्रादेशिक पर्यटन अंतर्गत या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर, पर्यटकांना राहण्यासाठी तंबू, रेस्टरूम, गार्डन, रस्ते, स्वच्छतागृह इत्यादीसाठी चार कोटी रुपये निधी देण्यात आलेला असून त्याचे काम सध्या सुरू आहे. याचबरोबर जिल्हा नियोजन समिती सोलापूर यांच्याकडून ई-कार, स्विमिंग टॅक, महिला बचत गट भवन, ग्रामीण वस्तू संग्रहालय, बंधारा यासाठी अंदाजे दोन कोटी पेक्षा जास्त निधी दिलेला आहे. याचबरोबर २५१५, जनसुविधा, यासारख्या निधीमधून वेगवेगळ्या विकास कामाला पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. सध्या पाणीपुरवठा योजना (१७एच.पी.) सौरऊर्जेवर चालू असून गावामध्ये ३० सौर ऊर्जेवरील पथदिवे बसवण्यात आलेले आहेत. यासाठी प्रिसीजन फाउंडेशन यांचे सीएसआर मधून मदत करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात मुख्यमंत्री सौर घर योजनेमध्ये सहभाग घेऊन संपूर्ण गाव सौरऊर्जेवर करण्यात येणार आहे. त्यासह गावांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करून छतावरील पाणी जमिनीमध्ये जिरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. गावामध्ये गेल्या आठ वर्षा पासून दिवाळी यात्रा लग्न उत्सव इत्यादी कोणत्याही कारणासाठी स्वयंपुर्तीणे फटाके वाजवले जात नाहीत. गावामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील अभ्यास केंद्र त्याचबरोबर ग्रामीण वस्तुसंग्रहालय नवीनच उभे राहत असलेली वारी आणि तमाशा हे सांस्कृतिक केंद्र उभे राहत आहे.
महत्वाची वैशिष्ट्ये
हरितग्राम
१२,०००+ झाडांची वृक्षारोपण मोहीम
विस्थापनानंतर शून्यातून उभं केलेलं पर्यावरणपूरक गाव
देशी जातींच्या झाडांमुळे पक्षी व जैवविविधता मोठ्या प्रमाणात
ग्रामीण पर्यटन केंद्र
क वर्ग पर्यटन दर्जा प्राप्त ग्रामीण पर्यटन केंद्र
वर्धायिणी महिला संस्थेमार्फत पर्यटन केंद्राचे संचालन
हुरडा पार्टी, गावरान चुलीवरील जेवण, बैलगाडी सफर, शिवार फेरी
रोजगारनिर्मितीमध्ये अग्रगण्य
पर्यटन केंद्रामुळे गावातील पुरुष व महिलांना रोजगार
पगार पूर्णपणे ऑनलाईन
शेतकऱ्यांसाठी आधुनिक पिके – स्वीटकॉर्न, हुरडा, फलोत्पादन
संपूर्ण पाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर
१७ HP सौर पंप
३०+ सौर पथदिवे
डिजिटल व आधुनिक शिक्षण
-
जि.प. शाळेमध्ये १८ टॅब, २ स्मार्ट टीव्ही, डिजिटल वर्ग
-
‘स्वच्छ शाळा – सुंदर शाळा’ पुरस्कार
शाश्वत विकास मॉडेल
दर रविवारी सामूहिक स्वच्छता
ग्रामसभा केंद्रित निर्णयप्रक्रिया
केंद्रीय मंत्रालयांकडून ट्विटरवर कौतुक
पायाभूत सुविधा
डांबरी रस्ते
ओपन जिम
ग्रामीण वस्तू संग्रहालय
खेळणी पार्क
स्विमिंग टँक
तंबू सुविधा (tourist tents)
पर्यावरण संवर्धन व जलव्यवस्थापन
वृक्षारोपण
10,000+ झाडे
प्लास्टिक बंदी
फटाकेबंदी
पक्षी संवर्धन
पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे
