चिंचणी हे सोलापूर जिल्ह्यातील क वर्ग पर्यटन दर्जा प्राप्त आणि लोकसहभागातून उभे केलेले ग्रामीण कृषी पर्यटनाचे उत्कृष्ट केंद्र आहे.
पर्यावरण, शेती आणि ग्रामसंस्कृती यांचा सुंदर संगम साधत हे पर्यटन केंद्र आज हजारो पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे.
वरदायिणी महिला सहकारी संस्थेमार्फत पर्यटन संचालन
चिंचणी कृषी पर्यटन केंद्र संपूर्णपणे वरदायिणी महिला बहुउद्देशीय सामाजिक सेवा सहकारी संस्था चालवते.
प्रत्येक कुटुंबातील एक महिला या संस्थेची सभासद आहे.
पर्यटन केंद्रातील स्वयंपाक, व्यवस्थापन, स्वच्छता, भोजन, आयोजन — सर्व कामांचे संपूर्ण नेतृत्व महिलांकडे आहे.
संस्थेची नोंदणी पर्यटन संचालनालय (DOT) कडे असून, केंद्र DOT च्या मार्गदर्शनाखाली चालवले
कृषी पर्यटनाचे मुख्य आकर्षण
हुरडा पार्टी
चिंचणीची खास ओळख — हुरडा पार्टी
हंगामात प्रचंड प्रमाणात हुरडा ग्राहक येतात
परंपरागत चुलीवर शिजवलेला हुरडा, गावरान स्नॅक्ससोबत
गावरान चुलीवरील जेवण
पिठलं–भाकरी
पुरणपोळी
दही–धपाटे
मिरी ठेचा
शेंगाची चटणी
गावरान चुलीवर शिजवलेले वर्षभर उपलब्ध जेवण
बैलगाडी सफर
पर्यटकांसाठी पारंपारिक बैलगाडी फेरी
ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव
शिवार फेरी
स्वीटकॉर्न मका
ज्वारी
हुरडा
बोरं
हरभरा डहाळा
उसाचा रस
इतर पारंपारिक पीक व शेतातील अनुभव
पर्यटनातील उपलब्ध सुविधा
टेंट स्टे / निवास
प्रादेशिक पर्यटन निधीतून उभारलेली तंबू राहण्याची सुविधा
स्विमिंग टँक
जिल्हा नियोजन समिती निधीतून बांधलेला पर्यटन केंद्राचा मोठा स्विमिंग टँक
गार्डन आणि मुलांची खेळणी
मुलांसाठी खेळणी व सुरक्षित ओपन प्ले क्षेत्र
ग्रामीण वस्तू संग्रहालय
गावाचा इतिहास, पारंपारिक साधने, शेती संस्कृती दर्शवणारे संग्रहालय
ई–कार (बग्गी) गावदर्शन
पर्यटकांना गाव पाहण्यासाठी ई-कार सुविधा
पुरस्कार, मान्यता आणि नेतृत्व
पर्यटन केंद्राच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी
मंत्री
प्रशासकीय अधिकारी
सामाजिक संस्थांनी
महिलांचे कौतुक केले.
चिंचणी पर्यटन केंद्राला विविध सामाजिक संस्थांकडून पुरस्कार व प्रशस्तिपत्रे मिळाली आहेत.
पर्यटन वाढ आणि विकास
गेल्या तीन वर्षांत २५,००० पेक्षा जास्त पर्यटकांनी चिंचणीला भेट दिली.
लोकसहभाग, लोकवर्गणी आणि शासकीय निधीच्या मदतीने चालणारे
महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन केंद्र असण्याची शक्यता.
चिंचणी कृषी पर्यटनाची प्रमुख वैशिष्ट्ये
✔ DOT-नोंदणीकृत महिला–नेतृत्वाखालील पर्यटन केंद्र
✔ हुरडा पार्टी व पारंपारिक ग्रामीण खाद्यपदार्थ
✔ शिवार फेरी आणि शेती–अनुभव
✔ स्विमिंग टँक, गार्डन, खेळणी, टेंट स्टे
✔ ई-कारने गावदर्शन
✔ रोजगार निर्मिती — स्थलांतर शून्य
✔ शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्न
✔ सांस्कृतिक व पारंपारिक कार्यक्रम